Friday, June 13, 2008

Marathi Jokes - सरदार पाहूणा

Previous Joke Next Joke

.

एक सरदार पाहूणा म्हणून अमेरिकेला आपल्या मित्राकडे गेला. मित्राने बाहेर कामावर जातांना सरदारजीला , '' समोरचं दार आतून बंद करुन घे, बाहेर जातांना दाराला कुलूप लावून जा, काही प्रॉब्लेम असल्यास 911 ला फोन कर '' वैगेरे वैगेरे सगळ्या सुचना दिल्या. कारण त्या भागात खुप चोऱ्या व्हायच्या.

सरदारजीचा मित्र संध्याकाळी कामावरुन घरी आला, पाहतो तर जे व्हायला नको होतं तेच झालं होतं. घरात चोरी झाली होती. सरदारजीचा मित्र सरदारजीवर जाम भडकला -

'' तुला सांगितलं होतं ना मी बाहेर जातांना कुलूप लावून जा म्हणून''

'' मी बाहेर गेलोच नाही'' सरदारजी म्हणाला.

'' तुला सांगितलं होतं ना मी की दार आतून बंद करुन घे म्हणून"

'' हो मी दार आतून बंद केलं होतं.. पण चोर खिडकीतून आत आले''

'' म्हणजे तुला चोर आल्याचं माहित होतं?''

'' हो मी या खोलीत बसून त्यांची त्या खोलीत चाललेली सगळी खुडबुड ऎकत होतो''

'' मग तु त्यांना का नाही रोखलं'' त्याच्या मित्राने विचारले.

'' कारण ते चार होते आणि मी एकटा... आणि त्यांच्याजवळ बंदूका होत्या''

'' मी तुला सांगितलं होतं ना की काही गडबड झाल्यास 911 ला फोन कर म्हणून... फोन तर तुझ्या खोलीतच होता''

'' मी प्रयत्न केला ना ... तुझ्या फोनवर मला 9 नंबरचं बटण सापडलं पण 11 नंबरचं बटन किती शोधलं तरी सापडलंच नाही'' सरदारजी म्हणाला.

.

Previous Joke Next Joke

2 comments:

  1. good joke
    पण एक गंमत आहे..खरतर....
    मित्राने सरदार पाहूण्याला 911असे सागंण्या ऎवजी असे सांगायला हवे होते 9+1+1 दाब.

    ReplyDelete
  2. पाटीलसाहेब, मग त्याला प्रश्न पडला असता की + चं बटण कुठे आहे?

    ReplyDelete

POPULAR JOKES====>