Wednesday, July 30, 2008

Marathi comedy photo - Funny bags - II

Previous Joke Next Joke

..

Previous Joke Next Joke

Monday, July 28, 2008

Marathi comedy photo - Funny bags

Previous Joke Next Joke

..

Previous Joke Next Joke

Friday, July 25, 2008

Marathi Jokes - आवेदन

Previous Joke Next Joke

.

एकजण एका नोकरीचे आवेदन भरीत होता. जेव्हा त्याने आवेदनात प्रश्न वाचला, '' तुम्ही कधी अरेस्ट झाला होतात?''

त्याने उत्तर लिहिले ''नाही''

खाली दुसरा प्रश्न होता '' का?'' खरं म्हणजे हा प्रश्न त्यांच्यासाठी होता जे कधी अरेस्ट झाले होते. पण या आवेदकाने उत्तर लिहिले, '' कारण कधी त्यांचा हाती लागलोच नाही''

.

Previous Joke Next Joke

Wednesday, July 23, 2008

Marathi Jokes - ऍस्प्रीन

Previous Joke Next Joke

.

एक सरदारजी एका मेडीकल शॉपमध्ये गेला आणि त्याने दुकानदाराला विचारले, '' तुमच्याकडे ऍसीटीलसॅलीसायक्लीक ऍसीड आहे का?''

''म्हणजे तुम्हाला ऍस्प्रीनच पाहिजे ना? '' दुकानदाराने विचारले.

'' हो ... हो तेच ... ते काय आहेना की त्याचं नाव लक्षात ठेवणं जरा कठिनच आहे''

.

Previous Joke Next Joke

Monday, July 21, 2008

Marathi Jokes - मदत करण्याचा प्रयत्न

Previous Joke Next Joke

.

एक सज्जन माणूस रात्री उशीरा घरी चालला होता तेव्हा त्याला फुटपाथवर एका बिल्डीगच्या पायऱ्यापाशी एक दारुडा दिसला. तो पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करीत होता पण तो एवढा पिलेला होता की तो दोन पायऱ्या चढायचा आणि खाली पडायचा. या सज्जन माणसाने त्या दारुड्याला मदत करण्याचे ठरविले. तो त्याच्याजवळ गेला.

'' तु इथे राहतोस?'' सज्जन माणसाने दारुड्याला विचारले.

'' हो''

'' मी तुला पायऱ्या चढण्यास मदत करु का?''

'' हो'' दारुडा म्हणाला.

जेव्हा त्या सज्जन माणसाने त्या दारुड्याला दुसऱ्या मजल्या पर्यंत धरुन आधार देत नेले तेव्हा त्याला विचारले,

'' हा तुझा मजला आहे का?''

'' हो '' तो दारुडा म्हणाला.

नंतर सज्जन माणसाने विचार केला की आपण या दारुड्याच्या घरी त्याच्या बायकोच्या समोर जायला नको. कारण आपल्याला याच्यासोबत पाहून तिला वाटेल की आपणच याला दारु पाजली. म्हणून त्याने पहिलं दार जे आलं त्याच्यासमोर त्या दारुड्याला उभं करुन आत ढकललं आणि तो सज्जन माणूस परत पायऱ्या उतरुन खाली आला. पण जेव्हा तो पायऱ्या उतरुन खाली आला तेव्हा खाली अजुन एक दारुड्या त्याला भेटला.

म्हणून सज्जन माणसाने त्या दारुड्याला विचारले,

'' तु इथे राहतोस?''

'' हो''

'' मी तुला पायऱ्या चढण्यास मदत करु का?''

'' हो'' दारुडा म्हणाला.

म्हणून त्या सज्जन माणसाने त्या दारुड्यालाही दुसऱ्या मजल्यावर त्याच दरवाजापर्यंत नेवून आत ढकलले, जिथे आधिच्या दारुड्याला आणून आत ढकलले होते. सज्जन माणूस पुन्हा पायऱ्या उतरुन खाली आला.

आणि काय आश्चर्य खाली त्याला अजुन एक दारुडा भेटला.

पण जेव्हा तो त्या दारुड्याला धरुन वर न्यायला लागला तेव्हा तो दारुडा जोर जोराने '' पोलिस.. पोलीस.. मदत करा..'' म्हणून ओरडला.

एक पोलीस धावतच तिथे आला.

'' काय झालं?'' पोलिसाने त्या दारुड्याला विचारले.

'' अहो बघांना हा माणूस रात्रभरपासून मला वर दुसऱ्या मजल्यावर नेतो आणि बाल्कनीच्या दारातून मला खाली ढकलून देतो आहे''


क्रमश:...

.

Previous Joke Next Joke

Friday, July 18, 2008

Marathi Jokes - हुशार कुत्रा

Previous Joke Next Joke

.

एकदा एका ऑफीसमध्ये एक क्लार्क पाहिजे होता. म्हणून त्यांनी ऑफीसच्या बाहेर एक बोर्ड लावला -

'' क्लार्क पाहिजे...

1. उमेदवाराला टायपींग आली पाहिजे.

2. उमेदवाराला कॉम्प्यूटरचं पुरेसं नॉलेज असलं पाहिजे.

3. आणि उमेदवाराला कमीत कमी दोन भाषा बोलता आल्या पाहिजेत.

सगळ्या उमेदवारांना सारखा अवसर दिल्या जाईल ''

थोड्या वेळाने एक कुत्रा त्या ऑफीसमध्ये आला. त्याने रिशेप्शनिस्ट जवळ जावून शेपूट हलवली आणि मग त्या नोकरीसाठी लावलेल्या बोर्डजवळ जावून पंजाने इशारा केला. त्या रिसेप्शनिस्टला त्याला काय म्हणायचे ते समजले असावे कारण तिने त्या कुत्र्याला मॅनेजरजवळ नेले. मॅनेजर जवळ जाताच तो कुत्रा मॅनेजरच्या समोरच्या खुर्चीवर पटकन उडी मारुन इंटरव्ह्यू देण्याच्या पावित्र्यात बसला.

मॅनेजर त्या कुत्र्याला म्हणाला, '' अरे बाबा मी तुला नोकरी देवू शकत नाही ... त्या बोर्डवर लिहिलं आहे की तुला टाईप करता आलं पाहिजे''

त्या कुत्र्याने ताबडतोब खुर्चीवरुन खाली उडी मारली आणि टाईपरायटर जवळ जावून एक बढीया लेटर टाईप केलं.

ते लेटर घेवून जेव्हा कुत्रा त्या मॅनेजरजवळ गेला तेव्हा मॅनेजरला तर आश्चर्याचा धक्काच बसला. पण नंतर मॅनेजर कुत्र्याला म्हणाला, '' अरे बाबा पण त्या बोर्डप्रमाणे तुला कॉम्प्यूटरचे ज्ञान असने आवश्यक आहे''

कुत्र्याने पुन्हा टूनकन खुर्चीवरुन खाली उडी मारली आणि कॉम्प्यूटर जवळ जावून वेगवेगळे सॉफ्टवेअर उघडून ते चालवू लागला. आतातर मॅनेचर चाटच पडला. मॅनेजर त्या कुत्र्याला कुरवाळत म्हणाला, '' माझ्या पुरतं लक्षात आलं आहे की खरोखरच तु दैवी देणग्या असलेला एक हुशार कुत्रा आहेस... पण तरीही हा जॉब मी तुला देवू शकत नाही''

त्या कुत्र्याने पुन्हा खुर्चीवरुन खाली उडी मारली आणि मॅनेजरचा पॅंन्ट दाताने पकडून त्याला त्या नोकरीच्या बोर्डजवळ नेले. आणि त्याने त्याच्या पंजाने ' सगळ्या उमेदवारांना सारखा अवसर दिल्या जाईल' या वाक्याकडे इशारा केला.

'' तुझं बरोबर आहे बाबा पण ह्या बोर्डनुसार तुला कमीत कमी दोन भाषा यायला पाहिजेत''

त्या कुत्र्याने शांततेने त्या मॅनेजरकडे पाहाले आणि तोंडाने आवाज काढला '' म्याऊं ''

.

Previous Joke Next Joke

Wednesday, July 16, 2008

Marathi jokes - पाण्यावर चालणारा

Previous Joke Next Joke

.

जुन्या काळी साधू पुरूष लोक पाण्यावर चाललेले आपण एकले असतील. पण याही युगात काही लोक पाण्यावर चालू शकतात -

.

Previous Joke Next Joke

Wednesday, July 9, 2008

Marathi Jokes - एका वेड्याचं पत्र

Previous Joke Next Joke

.

एक वेडा पत्र लिहित होता.

डॉक्टरांनी त्याला विचारले, '' कुणाला पत्र लिहितोस ?''

वेडा , '' मला स्वत:ला ''

डॉक्टर, '' काय लिहिलं आहे पत्रात ?''

वेडा , '' काय माहित... अजुन मला पत्र मिळालंच कुठं? ''

.

Previous Joke Next Joke

Monday, July 7, 2008

Marathi Jokes नदीच्या पलिकडे

Previous Joke Next Joke

.

---
संताला नदीच्या पलीकडे जायचं होतं पण कसं जावं त्याला काही कळत नव्हतं. तेवढ्यात त्याला नदीच्या पलिकडे बंता दिसला. संताने बंताला जोरात ओरडून विचारले, '' ए बंता... मी नदीच्या पलिकडे कसा येवू?''

बंताने नदीच्या आजुबाजुला चौफेर आपली नजर फिरवली आणि म्हणाला, ''अबे तु तर पलिकडेच आहेस ''

.

Previous Joke Next Joke

Friday, July 4, 2008

Marathi Jokes यमाच्या दरबारात

Previous Joke Next Joke

.

तिन जण स्वर्गात जाण्याच्या रांगेत उभे होते. यमाने त्यांना थांबवित म्हटले, '' स्वर्ग जवळपास फुल झालेला आहे त्यामुळे तुम्हापैकी ज्या कुणाचा मृत्यू अत्यंत भयानक तऱ्हेने झाला आहे अशालाच मी आत सोडणार आहे ... तर तुम्ही तुमची कहानी सांगा... आणि त्यावरुन मी ठरविन तुम्हाला आत सोडायचे आहे की नाही ''

पहिला माणूस आपली कहानी सांगू लागला,

'' एवढ्यात मला माझ्या बायकोवर संशय होताच... की तीचं कुठंतरी दुसरीकडे लफडं चालू असावं... म्हणून आज मी लवकर घरी आलो होतो की जेणेकरुन तिला रेड हॅन्डेड पकडावं... जेव्हा मी माझ्या 25 व्या मजल्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेलो... घरात काहीतरी मला खटकलं... पण घरात सर्वत्र शोध घेतला तरी कुणी सापडलं नाही... शेवटी मी बाल्कनीत गेलो आणि तिथे मला तो माणूस सापडला होता तो बाल्कनीत रेलींगला लोंबकळत होता... 25 मजले जमिनीपासून वर!... त्याला पाहताच माझा दिमाग सटकला आणि मी त्याला मारायला लागलो...हाताने पायाने सर्व प्रकाराने मी त्याला मारायला लागलो पण तो साला खाली पडतच नव्हता... शेवटी मी घरात परत आलो, एक हातोडा आणला आणि त्याच्या बोटांवर मारायला लागलो... तो काही जास्त वेळ ते सहन करु शकला नाही आणि तो खाली पडला... पण 25 व्या मजल्यावरुन पडूनही खाली तो एका झुडपात पडला आणि वाचला... माझं डोकं अजुनच सटकलं... मी किचनमध्ये गेलो आणि फ्रिज उचलून वरुन त्या माणसाच्या अंगावर टाकला... तो फ्रिज बरोबर त्याच्या अंगावर पडून तो जागच्या जागीच मेला.. पण तोपर्यंत माझा राग आणि ताण एवढा जास्त झाला होता की मीही हार्टअटॅक येवून बाल्कनीवर तिथल्या तिथेच मेलो..''

'' अरेरे ... तुझ्यासाठी आजचा दिवस फारच वाईट ठरला ... नाही?'' यम त्या माणसाला म्हणाला आणि त्याने त्याला आत घेतले.

रांगेतला दुसरा माणूस पुढे येताच यमाने त्यालाही तेच स्वर्ग जवळपास भरल्याचे सांगितले आणि त्याला त्याची कहानी सांगायला सांगितली.

दुसरा माणूस त्याची कहानी सांगायला लागला -

'' आजचा दिवस माझ्यासाठी फारच चमत्कारीक होता... काय झालं मी 26व्या फ्लोअरवर माझ्या अपार्टमेंटमधे राहतो आणि रोज सकाळी मी माझ्या बाल्कनीत व्यायाम करीत असतो... पण आज काय झालं... मी व्यायाम करतांना घसरलो असेन किंवा तसंच काहीतरी ... कारण मी माझ्या बाल्कनीच्या काठावरुन खाली पडलो ... पण माझं नशिब चांगलं माझ्या खालच्या फ्लोअरच्या बाल्कनीचं रेलींग माझ्या हाताला लागलं... मला माहित होतं की मी असा जास्तवेळ लटकत राहू शकणार नाही... तेवढ्यात अचानक हा माणूस बाल्कनीत आला... मला वाटलं की चला आता हा आपल्याला वाचवणार .. पण तो साला मला लाथा बुक्याने मारायला लागला.. मी आटोकाट प्रयत्न करुन रेलींगला धरुन लटकत होतो पण तेवढ्यात हा साला आत गेला आणि हातोडा घेवून येवून माझ्या बोटांवर हातोड्याने मारायला लागला... शेवटी माझे हात सुटले आणि मी म्हटलं जावूद्या आपण काही आज वाचत नाही ... पण पुन्हा मी लकी ठरलो आणि खाली एका झुडपात पडलो... घाबरलो होतो पण मला विषेश लागलं नव्हतं... जेव्हा मी विचार करीत होतो की आपण ठिक आहोत...तेवढ्यात एक रेफ्रिजरेटर वरुन खाली माझ्या अंगावर पडलं ... आणि मी इथे पोहोचलो''

.

Previous Joke Next Joke

Wednesday, July 2, 2008

Marathi Jokes - हिप्नोटीझम

Previous Joke Next Joke

.

एका मोठ्या हॉलमध्ये हिप्नोटीझमचा प्रयोग चालला होता. प्रयोग बघण्यास आणि अनुभवण्यास लोकांनी हॉलमध्ये एकच गर्दी केली होती. हिप्नोटीस्टने स्टेजवर उभं राहून आता हिप्नोटीजमच्या प्रयोगास सुरवात केली. त्याने खिशातून एक चेन असलेलं घड्याळ काढलं आणि ते घड्याळ पेंडूलमप्रमाणे हलवित लोकांना म्हटलं, '' आता तुम्ही या घड्याळीकडे पहा''

जसं घड्याळ उजवीकडे - डावीकडे हलू लागलं त्या घड्याळीकडे पाहतांना लोकांची बुबुळं सुध्दा तशी उजवीकडे - डावीकडे हलू लागली. आणि थोड्याच वेळात लोकांना तंद्री लागुन लोक हिप्नोटाईझ झाले. आता हिप्नोटीस्ट जसा आदेश देत असे तसे लोक वागू लागले. त्याने 'नाचा' म्हटलं की लोक नाचू लागत. 'तुमच्या हातात सफरचंद आहे आणि ते तूम्ही खात आहे' म्हटलं की लोक त्यांच्या हातातलं काल्पनीक सफरचंद खाऊ लागत.

हे सगळे आदेश देता देता गडबडीत त्या हिप्नोटीस्ट च्या हातातून ते घड्याळ खाली पडून फुटलं आणि त्याच्या तोंडून निघालं, '' शिट''

तो हॉल पुर्णपणे साफ करण्यासाठी पुढचे पाच दिवस लागले.

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>