'' क्लार्क पाहिजे...
1. उमेदवाराला टायपींग आली पाहिजे.
2. उमेदवाराला कॉम्प्यूटरचं पुरेसं नॉलेज असलं पाहिजे.
3. आणि उमेदवाराला कमीत कमी दोन भाषा बोलता आल्या पाहिजेत.
सगळ्या उमेदवारांना सारखा अवसर दिल्या जाईल ''
थोड्या वेळाने एक कुत्रा त्या ऑफीसमध्ये आला. त्याने रिशेप्शनिस्ट जवळ जावून शेपूट हलवली आणि मग त्या नोकरीसाठी लावलेल्या बोर्डजवळ जावून पंजाने इशारा केला. त्या रिसेप्शनिस्टला त्याला काय म्हणायचे ते समजले असावे कारण तिने त्या कुत्र्याला मॅनेजरजवळ नेले. मॅनेजर जवळ जाताच तो कुत्रा मॅनेजरच्या समोरच्या खुर्चीवर पटकन उडी मारुन इंटरव्ह्यू देण्याच्या पावित्र्यात बसला.
मॅनेजर त्या कुत्र्याला म्हणाला, '' अरे बाबा मी तुला नोकरी देवू शकत नाही ... त्या बोर्डवर लिहिलं आहे की तुला टाईप करता आलं पाहिजे''
त्या कुत्र्याने ताबडतोब खुर्चीवरुन खाली उडी मारली आणि टाईपरायटर जवळ जावून एक बढीया लेटर टाईप केलं.
ते लेटर घेवून जेव्हा कुत्रा त्या मॅनेजरजवळ गेला तेव्हा मॅनेजरला तर आश्चर्याचा धक्काच बसला. पण नंतर मॅनेजर कुत्र्याला म्हणाला, '' अरे बाबा पण त्या बोर्डप्रमाणे तुला कॉम्प्यूटरचे ज्ञान असने आवश्यक आहे''
कुत्र्याने पुन्हा टूनकन खुर्चीवरुन खाली उडी मारली आणि कॉम्प्यूटर जवळ जावून वेगवेगळे सॉफ्टवेअर उघडून ते चालवू लागला. आतातर मॅनेचर चाटच पडला. मॅनेजर त्या कुत्र्याला कुरवाळत म्हणाला, '' माझ्या पुरतं लक्षात आलं आहे की खरोखरच तु दैवी देणग्या असलेला एक हुशार कुत्रा आहेस... पण तरीही हा जॉब मी तुला देवू शकत नाही''
त्या कुत्र्याने पुन्हा खुर्चीवरुन खाली उडी मारली आणि मॅनेजरचा पॅंन्ट दाताने पकडून त्याला त्या नोकरीच्या बोर्डजवळ नेले. आणि त्याने त्याच्या पंजाने ' सगळ्या उमेदवारांना सारखा अवसर दिल्या जाईल' या वाक्याकडे इशारा केला.
'' तुझं बरोबर आहे बाबा पण ह्या बोर्डनुसार तुला कमीत कमी दोन भाषा यायला पाहिजेत''
त्या कुत्र्याने शांततेने त्या मॅनेजरकडे पाहाले आणि तोंडाने आवाज काढला '' म्याऊं ''
No comments:
Post a Comment