Monday, July 21, 2008

Marathi Jokes - मदत करण्याचा प्रयत्न

Previous Joke Next Joke

.

एक सज्जन माणूस रात्री उशीरा घरी चालला होता तेव्हा त्याला फुटपाथवर एका बिल्डीगच्या पायऱ्यापाशी एक दारुडा दिसला. तो पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करीत होता पण तो एवढा पिलेला होता की तो दोन पायऱ्या चढायचा आणि खाली पडायचा. या सज्जन माणसाने त्या दारुड्याला मदत करण्याचे ठरविले. तो त्याच्याजवळ गेला.

'' तु इथे राहतोस?'' सज्जन माणसाने दारुड्याला विचारले.

'' हो''

'' मी तुला पायऱ्या चढण्यास मदत करु का?''

'' हो'' दारुडा म्हणाला.

जेव्हा त्या सज्जन माणसाने त्या दारुड्याला दुसऱ्या मजल्या पर्यंत धरुन आधार देत नेले तेव्हा त्याला विचारले,

'' हा तुझा मजला आहे का?''

'' हो '' तो दारुडा म्हणाला.

नंतर सज्जन माणसाने विचार केला की आपण या दारुड्याच्या घरी त्याच्या बायकोच्या समोर जायला नको. कारण आपल्याला याच्यासोबत पाहून तिला वाटेल की आपणच याला दारु पाजली. म्हणून त्याने पहिलं दार जे आलं त्याच्यासमोर त्या दारुड्याला उभं करुन आत ढकललं आणि तो सज्जन माणूस परत पायऱ्या उतरुन खाली आला. पण जेव्हा तो पायऱ्या उतरुन खाली आला तेव्हा खाली अजुन एक दारुड्या त्याला भेटला.

म्हणून सज्जन माणसाने त्या दारुड्याला विचारले,

'' तु इथे राहतोस?''

'' हो''

'' मी तुला पायऱ्या चढण्यास मदत करु का?''

'' हो'' दारुडा म्हणाला.

म्हणून त्या सज्जन माणसाने त्या दारुड्यालाही दुसऱ्या मजल्यावर त्याच दरवाजापर्यंत नेवून आत ढकलले, जिथे आधिच्या दारुड्याला आणून आत ढकलले होते. सज्जन माणूस पुन्हा पायऱ्या उतरुन खाली आला.

आणि काय आश्चर्य खाली त्याला अजुन एक दारुडा भेटला.

पण जेव्हा तो त्या दारुड्याला धरुन वर न्यायला लागला तेव्हा तो दारुडा जोर जोराने '' पोलिस.. पोलीस.. मदत करा..'' म्हणून ओरडला.

एक पोलीस धावतच तिथे आला.

'' काय झालं?'' पोलिसाने त्या दारुड्याला विचारले.

'' अहो बघांना हा माणूस रात्रभरपासून मला वर दुसऱ्या मजल्यावर नेतो आणि बाल्कनीच्या दारातून मला खाली ढकलून देतो आहे''


क्रमश:...

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>