Friday, August 8, 2008

Marathi Jokes - पागलांची सुटका

Previous Joke Next Joke

.

आयर्लंडमध्ये एक पागलखाना आहे. दरवर्षी ते पागलखान्यातल्या ज्यांची त्या वर्षी चांगली प्रगती आहे अशा दोघांना निवडतात आणि त्यांना दोन प्रश्न विचारतात. जर त्यांनी त्या दोन प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर ते त्यांना सोडून देतात.

यावर्षी त्यांनी पॅटी आणि माईकला निवडले.

प्रथम डॉक्टरने पॅटीला आत ऑफीसमधे बोलावले. त्यांनी त्याला पहिला प्रश्न विचारला, '' पॅटी जर मी तुझा एक डोळा काढला तर काय होईल?''

'' तर मला एका डोळ्याने दिसणार नाही'' पॅटीने पटकन उत्तर दिले.

'' जर मी तुझे दोन्ही डोळे काढले तर काय होईल? '' डॉक्टरने दुसरा प्रश्न विचारला.

'' तर मला दोन्ही डोळ्याने दिसणार नाही'' पॅटीने उत्तर दिले.

डॉक्टरने पॅटीला सोडून दिले आणि ऑफीसच्या बाहेर पाठवून त्याला माईकला आत पाठविण्यास सांगितले.

बाहेर आल्यावर पॅटीने माईकला डॉक्टरने कोणते प्रश्न विचारले होते आणि त्याने त्याची काय उत्तरं दिली ते सर्व सविस्तर सांगितले आणि त्याला आत ऑफीसमध्ये पाठवले.

माईक ऑफिसमध्ये येताच डॉक्टरने त्याला पहिला प्रश्न विचारला, '' जर मी तुझा एक कान कापला तर काय होईल?''

'' तर मला एका डोळ्याने दिसणार नाही'' माईक पॅडीने सांगितलेले उत्तर आठवून म्हणाला.

डॉक्टरने आश्चर्याने त्याच्याकडे पाहत त्याला दुसरा प्रश्न विचारला, '' जर मी तुझे दोन्ही कान कापले तर काय होईल?''

'' तर मला दोन्ही डोळ्याने दिसणार नाही'' माईकने गालातल्या गालात हसत उत्तर दिले.

पण नंतर डॉक्टरने माईकला विचारले की कसे काय तुला दिसणार नाही ? तर माईकने उत्तर दिले, ''

जर माझा एक कान कापला तर माझी हॅट खाली येवून माझा एक डोळा झाकला जाईल आणि माझे दोन्ही कान कापले तर माझी हॅट खाली येवून माझे दोन्ही डोळे झाकले जातील''


Marathi Joks, Marathi chutkule, Marathi comedy express, Marathi hasya sabha, Marathi hasya kavi sammelan, Marathi vinod, Marathi Tv, Marathi katha, Maharastra jokes, Maharastra vinod

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>