Friday, August 29, 2008

Marathi Jokes - सोपा प्रश्न

Previous Joke Next Joke

.

संता शेवटी शेवटच्या राऊंडला 10 लाख रुपये बक्षीसाच्या प्रश्नापर्यंत पोहोचला होता. प्रश्न विचारण्याच्या एक रात्र आधी त्याने प्रोग्रॅमच्या ऍन्कर बंताला सांगितले की त्याला तो प्रश्न भारतिय इतिहासावर विचारल्या जावा कारण इतिहास हा त्याचा आवडता विषय होता.

शेवटी ती रात्र आली जेव्हा संताला 10 लाख रुपये बक्षीसाचा प्रश्न विचारल्या जाणार होता. संता ऐटीत स्टेजवर सगळ्या स्टूडीओ आणि टीव्ही दर्शकाच्या समोर गेला. प्रोग्रॅमचा ऍन्कर बंताने त्याचे स्वागत केले. दर्शकानेही टाळ्या वाजवून संताचे स्वागत केले.

प्रोग्रॅमचा ऍन्कर बंताने माईक हातात घेवून प्रोग्रॅमची सुरवात केली -

'' तर संताजी तूम्ही तुमच्या शेवटच्या प्रश्नासाठी भारतिय इतिहास या विषयाची निवड केली ... बरोबर?''

'' हो'' संता अभिमानाने मान उंचावत म्हणाला.

'' आणि तूम्हाला माहितच आहे जर तुमचा प्रश्न बरोबर असेल तर तुम्हाला बक्षीसस्वरुप 10 लाख रुपए मिळणार आहेत... तर तुम्ही तयार आहात?''

'' हो ... तयार आहे'' संता पुन्हा अभिमानाने म्हणाला.

'' संताजी तुमचा भारतिय इतिहासावरचा हा प्रश्न दोन भागांचा आहे... जसं तुम्हाला माहित आहेच की तुम्ही कोणताही भाग आधी उत्तर देण्यास निवडू शकता... आणि नियमाप्रमाणे... प्रश्नाचा दुसरा भाग हा नेहमी सोपा असतो.. तर तुम्ही कोणता भाग आधी उत्तर देण्यास निवडणार आहात?'' बंताने विचारले.

संताने थोडा वेळ विचार केला. त्याला माहित होते की हा शेवटचा प्रश्न आहे. त्यामुळे जोखिम घेणे योग्य नव्हे.

'' मी प्रश्नाच्या सोप्या भागाचे उत्तर प्रथम देईन'' संता म्हणाला.

प्रोग्रॅमच्या ऍन्कर बंताने होकारार्थी मान हलवली.

'' तर ठिक आहे संताजी मी प्रश्नाचा दुसरा भाग प्रथम विचारीन आणि पहिला भाग नंतर विचारीन''

संताने होकारार्थी मान हलवली.

'' तर ठिक आहे हा आहे तुमचा प्रश्न - आणि कोणत्या वर्षी ती लढाई झाली?''


Marathi jokes, Marathi chutkule, Marathi gags, Marathi comedy, Marathi hasya, Marathi gamti, Marathi songs, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi MP3, Marathi mobile tunes, Marathi mazi


, May marathi

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>