.

Wednesday, September 17, 2008

Marathi Jokes - विमानात सरदार

एकदा एका सरदाराला पहिल्यांदाच विमानात बसण्याची संधी मिळाली. तो आधी कधी विमानात बसला नव्हता त्यामुळे खुप उत्साहात होता. जसा तो बोईंग 747 मध्ये चढला तो उत्साहाने उड्या मारत, आणि एका सिटवरुन दुसऱ्या सिटकडे धावत ओरडायला लागला, "BOEING! BOEING!! BOEING!!! BO....."

त्याला जणू आपण कुठे आहोत आणि काय करीत आहोत याचा विसरच पडला होता. कॉकपीटमध्ये बसलेला पायलटही त्याच्या या ओरडण्याने त्रासून गेला होता. शेवटी चिडून तो पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्या सरदाराला जोरात रागावला, "BE SILENT!"

विमानात सर्वत्र स्मशानवत शांतता पसरली. विमानात बसलेले सगळे प्रवासी रागावलेल्या पायलटकडे आणि त्या सरदाराकडे पाहायला लागले. त्या सरदाराने दोन क्षण त्या पायलटकडे पाहाले, काहीतरी विचार केल्यासारखे केले आणि तो पुन्हा ओरडायला लागला, "OEING! OEING! OEING! OE...."


Marathi jokes, Marathi vinod, Marathi comedy, Marathi laughter, Marathi hasya, Marathi katha, Marathi gosti, Marathi charolya, Marathi shayari, Marathi sher, Marathi kavya, Marathi kavita

0 comments:

Marathi Jokes Categories

--Send the jokes to your friends-

Custom Search

....1....
Marathi Novels
....2....
English Novels
....3....
Hindi Novels
....4....
English Jokes
....5....
Hindi Jokes

Custom Search

Social Network