Wednesday, October 8, 2008

Marathi Jokes - संता इंग्लीशचा शिक्षक

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes - संता इंग्लीशचा शिक्षक

सरदार संता सिंग शाळेत इंग्लीशचा शिक्षक होता. त्याचं शाळेत फार नाव झालं होतं कारण त्याचे विद्दार्थी त्याच्या विषयात फार चांगले मार्कस घेत होते.

एक दिवस संता सिंग त्याच्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत होता.

संता सिंग -'' पोरहो म्हणा - गाढव''

सगळी मुलं एका आवाजात ओरडली ''गाढव''

संता सिंग - '' पोरहो म्हणा - गाढव, गाढवाच्या मागे गाढव''

सगळी मुलं एका आवाजात ओरडली '' गाढव, गाढवाच्या मागे गाढव''

संता सिंग - '' पोरहो म्हणा - गाढव, गाढवाच्या मागे गाढव, गाढवाच्या मागे मी''

सगळी मुलं एका आवाजात ओरडली ''गाढव, गाढवाच्या मागे गाढव, गाढवाच्या मागे मी''''

संता सिंग - '' पोरहो म्हणा - गाढव, गाढवाच्या मागे गाढव, गाढवाच्या मागे मी आणि माझ्या मागे सगळा देश''

सगळी मुलं एका आवाजात ओरडली '' गाढव, गाढवाच्या मागे गाढव, गाढवाच्या मागे मी आणि माझ्या मागे सगळा देश''

आतापर्यंत वर्गाच्या बाहेरुन पाहणारा इन्स्पेक्शन करणारा अधिकारी रागाने लाल लाल झाला होता. तो रागाने पाय आपटत मुख्याध्यापकाकडे गेला आणि म्हणाला, '' तो संता सिंग वर्गात काय शिकवतो आहे? ... जरा बघा... त्याने वर्गात इंग्लीश शिकवायला पाहिजे ... अन तो - गाढव, गाढवाच्या मागे गाढव, गाढवाच्या मागे मी आणि माझ्या मागे सगळा देश, असं काय विचित्र शिकवीत आहे.''

मुख्याध्यापकही चाटच पडला.

संता सिंग एक नावाजलेला इंग्लीश शिक्षक असं कसं करु शकतो?...

मुख्याध्यापकाने ताबडतोब संता सिंगला बोलवून घेतले.

'' संता सिंगजी तुम्ही वर्गात - गाढव, गाढवाच्या मागे गाढव, गाढवाच्या मागे मी आणि माझ्या मागे सगळा देश, - हे काय वायफळ शिकवीत आहात''

'' हो बरोबर आहे ... त्यात काय वायफळ आहे? ... मी तर फक्त ASSASSINATION चं स्पेलींग शिकवीत होतो.

ASS ASS I Nation


Marathi jokes, Marathi vinod, Marathi latife, Marathi chutkule, Marathi fun, Marathi funny kisse, Marathi comedy, Marathi hasya, Marathi laughter, Marathi laughter challenge, Marathi gamti jamti

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>