एका सरदाराने आपली हेलिकॉप्टरच्या पायलटची ट्रेनिंग पुर्ण केली. म्हणून त्याची परिक्षा घेण्यासाठी ट्रेनिंगस्कुलने त्याला एक हेलिकॉप्टर उडविण्यास दिले आणि त्याला खाली कंट्रोलरुमसोबत सतत कॉन्टॅक्ट ठेवण्यास सांगितला.
सरदार हेलिकॉप्टरमध्ये बसला आणि हेलिकॉप्टर उडवायला लागला. 1000 फुट वर गेल्यानंतर त्याने रेडीओवर खाली कंट्रोलरुमशी संपर्क केला, '' काळजी करण्याचं काही कारण नाही ... मी चांगल्या तऱ्हेने हेलिकॉप्टर उडवीत आहे... हेलीकॉप्टर उडविण्याची खुप मजा येत आहे आणि इथून खालची दृष्यही खुप चांगली दिसत आहेत. ''
2000 फुट वर गेल्यानंतर सरदाराने पुन्हा रेडीओवर खाली कंट्रोल रुमशी संपर्क साधला, '' 2000 फुट उंचीवर तर अजुन मजा येत आहे... मला तर वाटत आहेकी हेलीकॉप्टर चालवने ही जगातली सर्वात सोपी गोष्ट असावी... ''
नंतर कंट्रोल रुमने सरदारजीला 3000 फुट उंच जाताना पाहिले. पण थोड्या वेळाने कंट्रोल रुमवाल्यांना काळजी वाटायला लागली. कारण सरदारजीचा काहीच निरोप येत नव्हता.
अजुन थोडा वेळ गेल्यानंतर कंट्रोल रुमवाल्यांना माहित पडलेकी सरदारजीचं हेलिकॉप्टर अर्थ्या मैल अंतरावर खाली जमिनीवर पडलं आहे. कंट्रोल रुमचे काही लोक ताबडतोब तिथे गेले आणि त्यांनी खाली जमिनीवर पडलेल्या तुटलेल्या हेलिकॉप्टरच्या ढिगातून सरदारजीला बाहेर काढले. सरदारजीला कुठे कुठे मार लागला होता पण तो वाचला होता.
जेव्हा त्या लोकांनी सरदारजीला काय झाले होते म्हणून विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले, '' काय झालं ? मला काही माहित नाही... सगळं तर व्यवस्थित चाललं होतं ... पण जेव्हा मी 3000 फुटाच्या उंचीवर गेलो तेव्हा मला खुप थंडी वाजायला लागली... म्हणून मी वर जो मोठा पंखा फिरत होता त्याला बंद केलं... त्यानंतर काय झालं मला काही आठवत नाही ''
Marathi jokes, Marathi chutkule, Marathi latife, Marathi comedy, Marathi hasya, Marathi laugh, Marathi majak, Marathi maja, Marathi masti, Marathi entertainment, Marathi kahani, Marathi stories, Marathi karamnuk, Marathi cinema
No comments:
Post a Comment