गावातला एक खेडूत माणूस एका पॉश सिनेमा हॉलमध्ये पुर्ण तिन सिटवर हातपाय पसरवून बसला होता. जेव्हा तिथे सिनेमा हॉलचा एक कर्मचारी आला, त्याने खाली वाकून त्या खेडूताच्या कानाजवळ जात म्हटले, '' हे बघा तुम्ही इथे अशा तऱ्हेन बसू शकत नाही ''
यावर तो खेडूत नुसता गुरगुरला.
आता मात्र त्या कर्मचाऱ्याच्या संयमाचा बांध तूटायला आला होता, '' तुम्ही जर इथून उठला नाही तर मला नाईलाजास्तव मॅनेजरला बोलवावे लागेल''
यावर तो खेडूत अजून जोराने गुरगुरला.
तो कर्मचारी रागाने पाय आपटत तिथून निघून गेला आणि मॅनेजरला घेवून आला. दोघांनीही त्याला तिथून उठविण्याचे बरेच प्रयत्न केले पण तो तिथून हलण्यास तयार होईना. शेवटी त्यांनी पोलिसाला बोलावून आणले.
पोलिसाने त्यांची पुर्ण हकिकत ऐकून घेत त्या हातपाय पसरून बसलेल्या खेडूताकडे पाहत विचारले,
'' ए तुझं नाव काय आहे ?''
'' तुकाराम'' त्या खेडूताने उत्तर दिले.
'' कुठून आलास ?''
'' वरुन बाल्कनीतून '' त्या खेडूताने वेदनेने विव्हळत उत्तर दिले.
Marathi jokes comedy vinod, Majedar katha kahani, stress free kshan, Marathi stress free, tanav mukta, how to deal with stress, office Marathi jokes, maharastra jokes comedy vinod
No comments:
Post a Comment