Wednesday, November 12, 2008

Marathi jokes - अमेरीकन अधिकारी आणि कॅनेडीयन अधिकाऱ्यामधे घडलेला संवाद

Previous Joke Next Joke

.

खाली दिलेला 1995 मधे अमेरीकन समुद्री जहाजावरील अधिकारी आणि कॅनेडीयन अधिकाऱ्यामधे रात्री घडलेला खराखूरा संवाद आहे --

कॅनेडीयन अधिकारी (लाऊडस्पिकरवर ) - अपघात टाळण्यासाठी कृपया आपले जहाज 15 अंश दक्षिणेकडे वळवा.

अमेरीकन अधिकारी (लाऊडस्पिकरवर) - अपघात टाळण्यासाठी कृपया आपणच आपले जहाज 15 अंशाने उत्तरेकडे वळवावे.

कॅनेडीयन अधिकारी (लाऊडस्पिकरवर ) - नाही हे शक्य नाही, अपघात वाचविण्यासाठी तुम्हालाच तुमचे जहाज 15 अंश दक्षिणेकडे वळवावे लागेल.

अमेरीकन अधिकारी (लाऊडस्पिकरवर) - मी अमेरीकन नेव्ही जहाजाचा कॅप्टन बोलतो आहे. मी पुन्हा सांगतो की तुमचे जहाज 15 अंशाने उत्तरेकडे वळवा.

कॅनेडीयन अधिकारी (लाऊडस्पिकरवर ) - नाही, मी पुन्हा सांगतो तुम्ही तुमचे जहाज 15 अंशाने दक्षिणेकडे वळवा.

अमेरीकन अधिकारी (लाऊडस्पिकरवर) - हे अमेरिकन प्लेन कॅरीयर यूएस लिंकन जहाज आहे, अमेरीकन नेव्हीत असलेले जगातले दुसरे सगळ्यात मोठे जहाज. आणि आमच्याजवळ तिन मोठे मोठे विनाशक रॉकेट्स, पाच स्फोटकानी भरलेले प्लेन्स आणि त्याच्याव्यतिरिक्त भरपुर शस्त्रास्त्र साठा आहे. आणि या जहाजाचा मी कॅप्टन आहे. मी तुम्हाला ऑर्डर आणि चेतावनी देतो आहे की तुम्ही तुमचे जहाज ताबडतोब 15 अंशाने उत्तरेकडे वळवावे अन्यथा आम्ही आमचे जहाज वाचविण्यासाठी कडक कार्यवाही करु.

कॅनेडीयन अधिकारी (लाऊडस्पिकरवर ) - आम्ही 15 अंशाने उत्तरेकडे वळू शकत नाही कारण हे एक लाईट हावूस आहे.


Marathi jokes, Marathi vinod, Marathi gosti, Marathi literature, Marathi comedy, Marathi fun, Marathi funny videos photos, Marathi funny stories, Marathi kala art, Marathi pilgrimage

.

Previous Joke Next Joke

1 comment:

  1. छान !
    पण ही विनोदी कथा नाही, ही एक बोधकथा आहे.

    ReplyDelete

POPULAR JOKES====>