Wednesday, December 31, 2008

Marathi Joeks : - स्वर्गात क्रिकेट आहे का?

Previous Joke Next Joke

.

Marathi Joeks : - स्वर्गात क्रिकेट आहे का?

दोन म्हातारे बऱ्याच वर्षापासून अगदी जिवलग मित्र होते. दोघांचही वय आता जवळपास 90च्या दरम्यान असेल जेव्हा त्यातील एक जण खुप आजारी पडला. त्याचा दुसरा मित्र त्याला रोज भेटायला येत असे आणि ते रोज आपल्या मैत्रीच्या गप्पा करीत असत. त्यांना आता जवळपास कल्पना आली होती की जो बिमार पडला आहे तो थोड्याच दिवसांचा साथीदार आहे. एक दिवस त्याच्या मित्राने मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राला म्हटले, '' बघ जेव्हा तू मरशील माझ्यासाठी एक काम करशील का?''

''कोणतं?'' मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राने विचारले.

'' तू मेल्यानंतर मला स्वर्गात क्रिकेट आहे का ते सांगशिल का?'' दुसऱ्याने विचारले.

दोघंही क्रिकेट वेडे होते.

'' का नाही जरुर सांगेन की'' मृत्यूशय्येवर पडलेला मित्र म्हणाला.

आणि एकदोन दिवसातच तो बिमार पडलेला मित्र मरण पावला.

काही दिवसानंतर जो जिवंत म्हातारा मित्र होता त्याला झोपेत त्याच्या मेलेल्या मित्राचा आवाज एकू आला-

'' तुझ्यासाठी माझ्याकडे दोन बातम्या आहेत... एक वाईट आणि एक चांगली... चांगली बातमी ही आहे की स्वर्गात क्रिकेट आहे ... ''

''आणि वाईट बातमी?''

'' आणि वाईट बातमी ही आहे की तुला येत्या बुधवारच्या मॅचमधे बॉलींग करायची आहे''


marathi jokes, swarg jokes, bujurg jokes, marathi old people jokes, marathi vinod, marathi hasi ka khajana, Marathi comedy, marathi comedy stories, marathi comedy cinema movie, marathi cartoons

.

Previous Joke Next Joke

Monday, December 29, 2008

Marathi Jokes - नाही ... नाही.... नाही

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes - नाही ... नाही.... नाही

एकदा एक राजा शिकारीसाठी जंगलात गेला होता. त्याने जंगलात धनुष्यबाण मारुन एका सिंहाची शिकार केली. पण धनुष्यबाण लागल्यानंतर मरण्याच्या आधी सिंह खुप तडफडला आणि त्याने खुप डरकाळ्या सुध्दा फोडल्या. त्यामुळे तिथे ध्यानस्थ बसलेल्या एका ऋषीची तपश्चर्या भंग झाली आणि त्याने रागाच्या भरात त्या राजाला शाप दिला. की तुझी उंची 25 फुट होवो की जेणेकरुन कोणत्याही प्राण्याची शिकार करण्याच्या आधी त्याला तुझी चाहूल लागून तो सावध होवो. रागाच्या भरात तर ऋषीने शाप दिला पण त्यामुळे राजाची उंची एवढी वाढली की त्याला कुठेही वावर करणे एकदम कठीण होवून बसले. म्हणून राजाने गयावया करुन त्या ऋषीची माफी मागीतली आणि त्याला त्याची उंची पुर्ववत करण्यास विनविले. राजाने बराच आग्रह आणि विनवणी केल्यामुळे ऋषीचा राग कमी होवून राजाला त्याचे त्याची उंची पुर्ववत करण्याचा एक उपाय सांगितला -

'' इथून पुढे 15 किमी अंतरावर जंगलाच्या आत एक वेडी बाई राहाते ... तु तिचा शोध घे आणि तिला असा प्रश्न विचार की तिने त्याचे उत्तर 'नाहॊ' असे दिले पाहिजे... तू तिला कितीही प्रश्न विचार आणि तिने जितके वेळा 'नाही' असे म्हटले तितके वेळा तुझी उंची 5 फुटाने कमी होईल.''

राजाने तिथून पुढे 15 किमी जंग जंग पछाडून त्या वेड्या बाईचा शोध लावला आणि त्या ऋषीने सांगितल्या प्रमाणे त्या बाईला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरवात केली.

'' तुला फाशी देवू का?''

'' हो''

'' तुला जंगलातून काढून देवू?''

'' हो''

राजाने तिला कितीतरी प्रश्न विचारुन हैरान केले पण तिचे उत्तर 'हो' असेच मिळत असे.

शेवटी राजाने चिडून तिला प्रश्न विचारला - '' तू पागल आहेस का?''

तिने पटकन उत्तर दिले - '' नाही''

आणि काय आश्चर्य राजाची उंची ताबडतोब पाच फुटाने कमी झाली.

राजाची उंची आता 20 फुट झाली होती. 20 फुट उंचीही खूप जास्त होती म्हणून राजाने तिला पुन्हा तोच प्रश्न विचारला -

'' तू पागल आहेस का?''

तिने पुन्हा उत्तर दिले '' नाही''

राजाची उंची पुन्हा 5 फुटाने कमी होवून राजा आता 15 फुटाचा झाला होता. 15 फुटही जास्तच होते म्हणून राजाने पुन्हा त्या वेडीला विचारले - '' तू पागल आहेस का?''

ती वेडी चिडून म्हणाली, '' तुला किती वेळ सांगायचं, नाही, नाही, नाही''


Marathi jokes, Marathi vinod, Marathi comedy, Maharastriyan jokes, Maharastriyan comedy, hindustani jokes, Hindustani comedy, Bhartiya jokes comedy, asian comedy jokes, comedy literature

.

Previous Joke Next Joke

Wednesday, December 24, 2008

Marathi sardar jokes - आज घरी ये

Previous Joke Next Joke

.

Marathi sardar jokes - आज घरी ये

एका सरदारजीने आपल्या गर्ल फ्रेंडला फोन केला, '' डार्लींग आज संध्याकाळी 6 वाजता माझ्या घरी ये... आज घरी कुणीच नाही आहे. ''

आपल्या बॉय फ्रेंड च्या म्हणण्यानूसार सरदारजीची गर्लफ्रेंड बरोबर संध्याकाळी 6 वाजता सरदारजीच्या घरी पोहोचली आणि एक तासभर घरात इकडे तिकडे शोधत राहाली कारण खरच घरी कुणी नव्हतं... सरदारजीसुध्दा.


Marathi jokes, Marathi vinod, Marathi chakatya, Gammat jammat, Marathi gags, Marathi cinema, Marathi songs, Marathi entertainment, Marathi friend jokes, Marathi comedy, Maharastra jokes

.

Previous Joke Next Joke

Monday, December 22, 2008

Marathi jokes - एक प्रश्न

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes - एक प्रश्न


प्रश्न - एका टाकीत दहा मासे होते, त्यातले सहा बुडाले तर टाकीत किती मासे उरले?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.


उत्तर - दहा ... कारण मासे कधी बुडत नाहीत.


Marathi questions, Marathi quiz, Marathi jokes, Maharastra jokes, Marathi fish jokes, Marathi tank jokes, Marathi jokes collection, Marathi question jokes, Marathi gags, jokes font, Jokes language

.

Previous Joke Next Joke

Monday, December 15, 2008

Marathi jokes - प्रश्न एक उत्तरं दोन

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes - प्रश्न एक उत्तरं दोन


संता आणि बंता गुरुद्वारातून परत येता येता गोष्टी करत होते. संताने बंताला विचारले, '' मी एक चेन स्मोकर आहे आणि मला दोन मिनिटंही स्मोकींग केल्याशिवाय होत नाही मला घरी देवाची पुजा करायला जवळपास एक तास लागतो... मग पुजा करतांना स्मोकींग करणे योग्य आहे का?''

बंता म्हणाला, '' तू एक काम कर उद्या जेव्हा आपन गुरुद्वारात जावू तेव्हा आपल्या धर्मगुरुला विचार''

दुसऱ्या दिवशी संताने गुरुद्वारात गेल्यावर संधी साधून आपल्या धर्मगुरुला विचारले, '' गुरुजी मला एक प्रश्न विचारायचा आहे''

गुरुजी '' विचार बेटा''

संता '' गुरुजी मी देवाची आराधना करतांना स्मोकींग करु शकतो का?''

गुरुजीने उत्तर दिले, '' बेटा नाही... तु तसं करु शकत नाही .. कारण त्यामुळे आपल्या देवाचा अपमान केल्यासारखं होईल''

संता बंताकडे गेला आणि त्याने बंताला गुरुजीने दिलेले उत्तर सांगितले.

बंता म्हणाला, '' लेका तू प्रश्न चुकिच्या पध्दतीने विचारला म्हणून तुला हे उत्तर मिळाले ... आता बघ मी तोच प्रश्न कसा विचारतो''

बंता धर्मगुरुकडे गेला आणि त्याने गुरुजीला प्रश्न विचारला, '' गुरुजी मी स्मोकींग करतांना देवाची आराधना करु शकतो का?''

गुरुजीने उत्तर दिले, '' बेटा तु स्मोकींग करतांना देवाची आराधना जरुर करु शकतो... देवाच्या आराधनेला वेळ काळ याचे काही बंधन नसते... जेव्हा केव्हा तुला देवाची आराधना करावीशी वाटली तेव्हा तु ती जरुर करु शकतोस''


Marathi jokes, Marathi vinod, Marathi chutkule, Marathi latife, Marathi charolya, Marathi fun, Marathi gamati, Marathi Tv, Marathi gosti, Marathi stories, Marathi comedy, Marathi font, Marathi blog

.

Previous Joke Next Joke

Friday, December 12, 2008

Marathi jokes - बायकोला फसवणे

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes - बायकोला फसवणे


एक माणूस पेपर वाचत बसला होता जेव्हा त्याच्या बायकोने त्याला फ्राईंग पॅनने डोक्यात मारले.

'' हे कशासाठी?'' त्या माणसाने विचारले

बायकोने उत्तर दिले '' ते तुझ्या पॅंन्टच्या खिशात एक कागदाचा तुकडा सापडला त्यावर 'जेनी' असे लिहिलेले होते त्यासाठी''

'' अग मागच्या हप्त्यात मी रेसकोर्सला गेलो होतो आणि ज्या घोड्यावर मी पैसे लावले होते त्याचे नाव 'जेनी' असे होते'' त्या माणसाने स्पष्टीकरण दिले.

बायकोने त्या माणसाची माफी मागितली आणि ती घरातली कामे करण्यासाठी निघून गेली.


तिन दिवसानंतर तो माणूस टिव्ही बघत बसला होता तेव्हा त्याच्या बायकोने अजुन एका मोठ्या फ्राईंग पॅनने जोराने त्या माणसाच्या डोक्यात मारले. एवढ्या जोराने की तो बेशुध्द पडला.

त्या माणसाने शुध्दीवर आल्यावर विचारले, '' आता हे कशासाठी मारले''

'' काल तुमच्या घोड्याचा फोन आला होता त्यासाठी '' त्याच्या बायकोने उत्तर दिले.


Marathi jokes, Marathi vinod, Marathi sahitya. Marathi comedy, Marathi fun, Marathi chutkule. Marathi latife, Marathi comedy circus, Marathi gosti, Marathi katha, Marathi videos pictures photos

.

Previous Joke Next Joke

Wednesday, December 10, 2008

Marathi Jokes : पृथ्वी आणि स्वर्गातला फरक

Previous Joke Next Joke

.

Marathi Jokes : पृथ्वी आणि स्वर्गातला फरक

एकाजणाने खुप तपश्चर्या केली आणि त्याला देव प्रसन्न झाला.

''देवा'' तो माणूस म्हणाला

'' बोल'' देव म्हणाला.

'' मी एक प्रश्न विचारु शकतो का?'' त्या माणसाने विचारले.

'' विचार'' देव म्हणाला.

'' देवा... करोडो वर्ष म्हणजे तुझ्यासाठी किती आहेत?'' त्या माणसाने विचारले.

'' करोडो वर्ष माझ्यासाठी एका सेकंदा एवढे आहेत'' देव म्हणाला.

त्या माणसाला खुप आश्चर्य वाटले.

मग त्या माणसाने पुढे विचारले, '' देवा, करोडो रुपयाची तुझ्यासाठी किती किंमत आहे?''

देव म्हणाला, '' करोडो रुपए माझ्यासाठी फक्त एका पैशासारखे आहेत''

तो माणूस धूर्तपणे म्हणाला, '' देवा, मग तु मला एक पैसा देशील''

देव गालातल्या गालात हसत म्हणाला, '' जरुर... फक्त एक सेकंद थांब''


Marathi jokes, marathi vinod, marathi gags, marathi photos, marathi sms, marathi tunes, marathi site, marathi blog, marathi laughter, marathi entertainment, marathi cinema, marathi sanwad, marathi man

.

Previous Joke Next Joke

Monday, December 8, 2008

Marathi jokes : फेडरल जज

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes : फेडरल जज

एकदा एका फेडरल जजची कार रात्री उशीरा शहरापासून दुर फेल पडली. तो जज जवळच असलेल्या एका फॉर्म हाऊसवर मदत मिळेल या आशेने गेला. तिथे एक सुंदर स्त्री राहत होती. ती म्हणाली की ती तिथे एकटी राहते त्यामुळे त्याला गॅरेज वैगेरे उघडण्यासाठी सकाळपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

'' मग त्या परिस्थीतीत मी तुमची मला रात्रभर इथे राहू देण्यासाठी विनंती करतो'' तो जज म्हणाला.

'' पण सर मी इथे एकटी आहे'' ती स्त्री म्हणाली.

'' भ्यायची काही गरज नाही शेवटी मी कोर्टाचा एक फेडरल जज आहे'' तो जज म्हणाला.

'' पण सर इथे फक्त एकच बेडरुम आहे'' ती स्त्री म्हणाली.

'' भ्यायची काही गरज नाही शेवटी मी कोर्टाचा एक फेडरल जज आहे'' तो जज म्हणाला.

ते दोघे बेडरुमकडे गेले आणि ती स्त्री म्हणाली, '' पण सर इथे तर फक्त एकच बेड आहे''

'' भ्यायची काही गरज नाही शेवटी मी कोर्टाचा एक फेडरल जज आहे'' तो जज म्हणाला.

म्हणून ते रात्री एकाच बेडवर एकमेकांकडे पाठ करुन झोपले.

सकाळी उठल्यावर जेव्हा जजने त्या स्त्री सोबत फॉर्म हाऊसच्या परिसरात एक चक्कर मारली, एका जागी त्याला कोंबड्यांचा कळप दिसला. पण जवळ जावून बघितल्यावर जजच्या लक्षात आले की त्या कळपात फक्त 20 कोंबड्या आहेत आणि जवळपास 60 कोंबडे आहेत. त्याला ते जरा विचित्रच वाटलं म्ह्णून त्याने त्या स्रीला विचारले, '' 60 कोंबडे आणि फक्त 20 कोंबड्या जरा विचित्रच वाटते नाही''

'' त्यात काय विचित्र... त्या 60 कोंबड्यांपैकी फक्त 10 कामाचे कोंबडे आहेत.''

'' आणि बाकी 50'' जजने विचारले

'' आणि बाकी 50 फेडरल जज आहेत'' त्या स्त्रीने उत्तर दिले.


Marathi new jokes, Marathi jokes, Marathi gags, Marathi fun, Marathi judge jokes, Marathi federal jokes, Marathi tricky jokes, Marathi farmhouse jokes, Marathi ladies jokes, Marathi must jokes, vinod

.

Previous Joke Next Joke

Friday, December 5, 2008

Marathi Jokes - Bihar Driving licence application form

Previous Joke Next Joke

.

बिहार ड्रायभींग लायसन अप्लीकेसन फोरोम (Bihar Driving licence application form)

--------------------------------------------------------------------------------------------

(नोट - प्लीज डू नाट सुट द परसन एट द अप्लीकेसन काऊंटर बिकाज ही इज द वन हू गीब्ज द लायसन) (Note - Please Do not shoot the person at the application counter because he is the one who gives the licence)

(फार इन्सट्रक्सन्स सी बाटम अप्लीकेसन)(For instruction, see bottom application)

-------------------------------------------------------------------------------------------

1. Last name:

(_) Yadav (_) Sinha (_) Pandey (_) Misra (_) Dot no (Don't know)

(Check karet box) (Check the correct box)

-----------------------

2. First name:

(_) Ramprasad (_) Lakhan (_) Sivprasad (_) Jamnaprasad (_) Dot no (Don't know)

(Check karet box) (Check the correct box)

---------------------------

3. Age:

(_) Less than phipty (_) Greater than phipty (_) Dot no (Don't know)

(Check karet box)

-----------------------

4. Sex: ____ (Laloo) _____ (Rabri)

5. Chappal Size: ____ Lepht ____ Right

--------------------

6.Occupason:

(_) Dacoit (_) Rapeist (_) Kidanapper (_) Politison (_) Doodhwala (_)

Pehelwaan (_) House wife (_) Un-employed

(Check karet box)

--------------

7. Number of children libing (लीभींग) in the household: ___

8. Read #7 agen & anser here: ___

9. Mather name: ____________ _________ __

10. Phather Name: ____________ ________ (don't leave blank)

11. Ejjucason: 1 2 3 4 ............ .. (Circle highest grade completed)

12. Dental rekard:

(_) Ellow(yellow) (_) Berownish- ellow (brownish yellow) (_) Berown (brown) (_) Belack(black) (_) Other

-__________ Give egjhakt (exact) color

(Check karet box)

14. Ice seight (Eye sight):

(_) One Ice (eye)(2x1) (_) Two Ice (eye)(2x2) (_) Half blind (_) Day blind (_) Night blind (_) 4/4 (_)6/6

15.Your thumb imparesson (impression) :

(If you are copying from another applikason pharom, please do not copy thumb impression also. Please provide your own thumb impression.)


PELEASE DO NOT USE PHINGERS (fingers) OF YOUR LEGS

Use thumb on your lepht hand only. If you don't have lepht hand, use your thumb on right hand. If you do not have right hand, use thumb on lepht hand.


NOTE : IF YOU DONT HAVE BOTH HANDS, YOU CANNOT DRIVE.


WE ARE VARY ISTRICT (strict) ABOUT THIS


Marathi jokes, Marathi vinod, Marathi new jokes, Marathi sahitya, Marathi literature, Marathi comedy, Marathi photos, Marathi videos, Marathi fun funny, Maharastra vinodi sahitya, Marathi cartoon

.

Previous Joke Next Joke

Wednesday, December 3, 2008

Marathi jokes एड्स

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes एड्स

मुलगा आपल्या वडीलांना डॉक्टरकडे घेवून गेला. डॉक्टरांनी त्यांना एक वाईट बातमी सांगितली की मुलाच्या वडिलाला कॅन्सर झालेला आहे. घरी परत जातांना वडिलांनी मुलाला सांगितले की आत्तापर्यंत त्यांनी जे प्रदिर्घ जिवन जगलं, ते ते सेलिब्रेट करु इच्छीतात. म्हणून त्यांनी रस्त्यात त्यांच्या मुलाला एका बारच्या समोर थांबण्यास सांगितले. बारमधे गेल्यांनतर मुलाच्या वडिलांना त्यांचे काही जुने मित्र भेटले. त्या मित्रांना मुलाच्या वडिलांनी सांगितले की लवकरच ते एड्स झाल्यामुळे मरणार आहेत.

जेव्हा मुलाच्या वडिलाचे मित्र तिथून निघून गेले तेव्हा मुलाने विचारले, '' डॅड तुम्हाला तर कॅन्सर झाला आहे ... मग तुम्ही तुमच्या मित्रांना खोटं का सांगितलं की तुम्हाला एड्स झालेला आहे? ''

त्याच्या वडिलाने उत्तर दिले, '' की जेणेकरुन माझ्या पश्चात ते तुझ्या आईला त्रास देवू नयेत म्हणून ''


marathi jokes, Marathi vinod, Marathi comedy, Marathi fun, Marathi musti masti, Marathi entertainement, Marathi gags, Marathi songs, Marathi videos, Marathi clips, Marathi photos images pictures, Marathi lyrics

.

Previous Joke Next Joke

Monday, December 1, 2008

Marathi jokes सरदार चंद्रावर

Previous Joke Next Joke

.

Marathi jokes सरदार चंद्रावर

प्रश्न - जर एक सरदार चंद्रावर गेला तर त्याला काय म्हणाल ?

उत्तर - प्रॉब्लेम

प्रश्न - जर दहा सरदार चंद्रावर गेले तर त्याला काय म्हणाल ?

उत्तर - प्रॉब्लेम्स

प्रश्न - आणि जर जगातील सगळे सरदार चंद्रावर गेले तर त्याला काय म्हणाल ?

उत्तर - प्रॉब्लेम सॉल्वड्


Marathi funny questions, Marathi funny prasna, Marathi gamtidar majedar prasna, Marathi prasna, Marathi comedy prasna, Marathi vinod, Marathi jokes, Marathi masti, Marathi gustakhi mauf

.

Previous Joke Next Joke

POPULAR JOKES====>