एकाजणाने खुप तपश्चर्या केली आणि त्याला देव प्रसन्न झाला.
''देवा'' तो माणूस म्हणाला
'' बोल'' देव म्हणाला.
'' मी एक प्रश्न विचारु शकतो का?'' त्या माणसाने विचारले.
'' विचार'' देव म्हणाला.
'' देवा... करोडो वर्ष म्हणजे तुझ्यासाठी किती आहेत?'' त्या माणसाने विचारले.
'' करोडो वर्ष माझ्यासाठी एका सेकंदा एवढे आहेत'' देव म्हणाला.
त्या माणसाला खुप आश्चर्य वाटले.
मग त्या माणसाने पुढे विचारले, '' देवा, करोडो रुपयाची तुझ्यासाठी किती किंमत आहे?''
देव म्हणाला, '' करोडो रुपए माझ्यासाठी फक्त एका पैशासारखे आहेत''
तो माणूस धूर्तपणे म्हणाला, '' देवा, मग तु मला एक पैसा देशील''
देव गालातल्या गालात हसत म्हणाला, '' जरुर... फक्त एक सेकंद थांब''
Marathi jokes, marathi vinod, marathi gags, marathi photos, marathi sms, marathi tunes, marathi site, marathi blog, marathi laughter, marathi entertainment, marathi cinema, marathi sanwad, marathi man
No comments:
Post a Comment