एक माणूस पेपर वाचत बसला होता जेव्हा त्याच्या बायकोने त्याला फ्राईंग पॅनने डोक्यात मारले.
'' हे कशासाठी?'' त्या माणसाने विचारले
बायकोने उत्तर दिले '' ते तुझ्या पॅंन्टच्या खिशात एक कागदाचा तुकडा सापडला त्यावर 'जेनी' असे लिहिलेले होते त्यासाठी''
'' अग मागच्या हप्त्यात मी रेसकोर्सला गेलो होतो आणि ज्या घोड्यावर मी पैसे लावले होते त्याचे नाव 'जेनी' असे होते'' त्या माणसाने स्पष्टीकरण दिले.
बायकोने त्या माणसाची माफी मागितली आणि ती घरातली कामे करण्यासाठी निघून गेली.
तिन दिवसानंतर तो माणूस टिव्ही बघत बसला होता तेव्हा त्याच्या बायकोने अजुन एका मोठ्या फ्राईंग पॅनने जोराने त्या माणसाच्या डोक्यात मारले. एवढ्या जोराने की तो बेशुध्द पडला.
त्या माणसाने शुध्दीवर आल्यावर विचारले, '' आता हे कशासाठी मारले''
'' काल तुमच्या घोड्याचा फोन आला होता त्यासाठी '' त्याच्या बायकोने उत्तर दिले.
Marathi jokes, Marathi vinod, Marathi sahitya. Marathi comedy, Marathi fun, Marathi chutkule. Marathi latife, Marathi comedy circus, Marathi gosti, Marathi katha, Marathi videos pictures photos
No comments:
Post a Comment