दोन सरदार बारमधे गेले, दोघांनीही एक एक ड्रींक मागवलं. ते एका टेबलभोवती बसले आणि जोरजोराने ओरडून चिअर्स करुन '51 दिवस ... 51 दिवस' असं म्हणत आनंद व्यक्त करु लागले. जवळजवळ 5 मिनीटाने अजुन एक सरदार आत आला, त्यानेही एक ड्रींग मागवलं आणि त्या दोघांच्या चिअर्स करण्यात आणि आनंद व्यक्त करण्यात सामिल झाला.
शेवटी अजून एक सरदार एक चित्रासारखं काहीतरी घेवून आला. त्याने ते चित्रासारखी गोष्ट टेबलवर मधोमध ठेवली आणि त्या सगळ्यांच्या चिअर्स आणि आनंद व्यक्त करण्यात सामिल झाला - ' हे 51 दिवस ... 51 दिवस'
त्यांच हे ओरडणं ऐकून बारटेंडरचीही उत्सुकता जागृत झाली. म्हणून तो त्यांच्या टेबलजवळ येवून पाहतो तर ते टेबलवर मधोमध ठेवलेलं चित्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक कोडं होतं.
'' तुम्ही लोक काय करीत आहात?'' त्या बारटेंडरने त्या सरदारजींना विचारले.
'' ते काय आहे... '' एक सरदार म्हणाला,'' सगळ्यांना वाटतं की सगळे सरदार मुर्ख असतात, म्हणून आम्ही त्यांना चुकीचं ठरविलेलं आहे''
'' कसं काय?'' बारटेंडरने विचारले.
'' बघा या कोड्यावर 2 ते 4 वर्ष असं लिहिलेलं आहे, पण आम्ही ते फक्त 51 दिवसात सोडवलं''
Marathi bar jokes, Marathi sardar jokes, Marathi drink jokes, marathi fun, Marathi photos, Marathi videos, Marathi entertainment, Marathi comedy, Marathi vinod, Marathi chutkule. Marathi sahitya
No comments:
Post a Comment