.
Marathi jokes - लागोपाठ तिन नातेवाईकांचा मृत्यू
एक माणूस बारमधे एकटाच दु:खी मनस्थितीत पित बसला होता. थोड्या वेळाने त्याचा एक मित्र त्याच्याजवळ जात म्हणाला, '' काय मित्रा.. फार दु:खी दिसतोस ... काय झालं?''
'' माझी आई ऑगस्टमधे वारली, '' तो म्हणाला.
'' अरे रे'' त्याचा मित्र दु:ख व्यक्त करीत म्हणाला.
'' बिचारी माझ्यासाठी 2.5 लाखाची इस्टेट सोडून गेली'' तो माणूस पुढे म्हणाला.
'' मग सप्टेबर मधे माझे वडील वारले'' तो म्हणाला.
'' अरेरे लागोपाठ दोन महिण्यात दोन घरातली माणसं गेली ... फारच वाईट झालं'' त्याचा मित्र म्हणाला.
'' बिचारे माझ्यासाठी 9 लाख रुपए सोडून गेले'' तो माणूस म्हणाला.
'' आणि मागच्या महिन्यात माझी काकु मला सोडून गेली''
'' अरेरे फारच वाईट झालं'' त्याचा मित्र म्हणाला.
'' ती माझ्यासाठी 1.5 लाख रुपए सोडून गेली '' तो माणूस म्हणाला.
'' घरची तिन माणसं लागोपाठ तिन महिण्यात ... खरंच किती वाईट गोष्ट'' त्याचा मित्र म्हणाला,
'' आणि इतका दु:खी होवून तु एकटाच पित बसला आहेस... याही महिन्यात कुणी गेलं की काय?'' त्या मित्राने विचारले.
'' नाही ना या महिण्यात कुणीच गेलं नाही ... त्याचंच तर खरं दु:ख आहे'' तो माणूस म्हणाला.
Marathi jokes, Marathi vinod, Marathi cinema, Marathi comedy literature, vinodi sahitya, vinodi wangmay, vinodi katha kathan, Marathi movies, Marathi cinema chitrapat, Marathi songs gite gani lyrics
.