एकदा एक आंधळा पर्यटक मुंबईला आला. मुंबईला पोहोचल्यावर विमानतळावरील बेंचला हात लावून चाचपडत म्हणाला, '' बापरे इथल्या खुर्च्या तर फारच मोठ्या आहेत..''
तिथे उभा असलेला एक भारतीय म्हणाला, '' इथे मुंबईत सगळं काही मोठं मोठं आहे''
फिरता फिरता तो एका बारमधे गेला आणि त्याने एक बियर मागवली. बारटेंडरने बियर भरलेला एक मोठा मग त्याच्या हातात दिला तेव्हा तो म्हणाला, '' बापरे इथे केवढे मोठे मग आहेत.''
'' इथे मुंबईत सगळं काही मोठं मोठं आहे'' तो बारटेंडर म्हणाला.
दोन तिन बियर पिल्यानंतर त्या आंधळ्या पर्यटकाने बारटेंडरला 'बाथरुम कुठे आहे?' असे विचारले.
''सरळ... उजव्या बाजुला दुसरा दरवाजा'' बारटेंडरने सांगीतले.
तो आंधळा पर्यटक बाथरुमला जावू लागला, पण चूकीने तो दुसरा दरवाजा ओलांडून तिसरा दरवाजा उघडून आत जावून तिथे असलेल्या स्विमिंग पुलमधे जावून पडला.
थोड्या वेळाने जेव्हा तो पुर्णपणे भिजलेला आंधळा पर्यटक बारटेंडर जवळ आला तेव्हा बारटेंडरने त्याला विचारले, '' अरे काय झाले... तु ओला कसा काय झाला''
'' तुमचं बरोबर आहे... इथे सगळं काही मोठं मोठं आहे... पण बाथरुमही एवढा मोठा असेल असं वाटलं नव्हतं'' तो आंधळा पर्यटक म्हणाला.
Marathi big small jokes, Marathi all type of jokes, Marathi pure jokes, Marathi funny jokes, Marathi first time jokes, Marathi trotter traveller jokes, Marathi jokes library dictionary catlog
No comments:
Post a Comment