Wednesday, May 27, 2009

Marathi doctor dentist jokes - धीट नवरा

Previous Joke Next Joke

.


Marathi doctor dentist jokes - धीट नवरा

एक माणूस आणि त्याच्या बायकोने दाताच्या डॉक्टरच्या ऑफिसमधे प्रवेश केला. तो माणूस डॉक्टरांना म्हणाला, '' डॉक्टर .. मी खुप घाईत आहे.. खरं म्हणजे बाहेर गाडीत माझे दोन मित्र बसून गोल्फ खेळायला जाण्यासाठी माझी वाट पाहत आहेत.. तुम्ही असं करा.. दाताला भूल वैगेरे देण्याच्या भानगडीत पडू नका आणि दात डायरेक्ट कडचीत पकडून ओढून काढा ... आम्हाला 10 वाजता गोल्फ क्लबला पोहोचायचं आहे आणि आता 9.30 वाजुन गेले आहेत... इंजक्शन देवून भूलीचा असर पडण्यासाठी थांबण्यास माझ्याजवळ वेळ नाही आहे...''

त्या डॉक्टरने विचार केला, ' काय धीट माणूस आहे... भूल दिल्याशिवाय दात काढायला सांगतो... ' म्हणून त्या डॉक्टरने त्या माणसाला विचारले.

'' साहेब .. कोणता दात काढायचा आहे?''

तो माणूस आपल्या बायकोकडे वळत म्हणाला, '' हनी जरा तोंड उघड आणि त्यांना दाखव बरं''

Marathi dentist doctor jokes,Marathi husband wife jokes, Marathi couple jokes, Marahti office jokes, Marathi golf jokes, Marathi funny jokes, Marathi entertainment, Marathi laughter, Marathi ukhane

.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>