चिंटू प्रथमच आपल्या आजोबासोबत गणपतीच्या मंदिरात गेला होता. मंदिरात शिरल्याबरोबर आजोबाने दारातली घंटा वाजवली. चिंटू बारकाईने आपले आजोबा काय काय करतात ते निरखून पाहत होता. नंतर आजोबा गणपति समोर हात जोडून डोळे मिटून बसले. चुन्तुही गणपतीसमोर हात जोडून बसला पण त्याने डोळे न मिटाता तो आजोबा अजुन काय काय करतात ते बघत होता. आजोबा डोळे मिटून दोन क्षण बसले आणि त्यांनी मग प्रार्थना केली -
आजोबा - '' देवा मला पाव ''
क्षणाचाही विलम्ब न लावता डोळे मिटून चिंटू म्हणाला - '' देवा मला खारी ''
एक गृहस्थ आपल्या ४ वर्षाच्या मुलाला डॉक्टर कड़े घेउन गेला
गृहस्थ - डॉक्टर, माज्या मुलाने चावी गिळली हो ...
डॉक्टर - त्याने चावी गिळन किती वेळ झाला ? गृहस्थ - दहा दिवस झाले असतील. डॉक्टर - काय ? ... दहा दिवस ... इतक्य दिवसानी तुम्ही त्याला माझ्याकडे आनता ? गृहस्थ - इतके दिवस आम्चायाकडे duplicate चावी होतीना ... पण ती आजच हरवली बघा
चिंटू :- अरे आमच्याकडे अशी एक गोष्ट आहे की जीने आम्ही भिंतीच्या पलिकडचे पण पाहू शकतो ... पिंटू :- खरच? ... अशी कोणती गोष्ट आहे तुमच्याकडे ? चिंटू :- खिड़की !
एक मौलवी आपल्या बायकोला म्हणाला - मी जेव्हा मरेन तेव्हा त्या आपल्या समोरचा शेजारनीला जरुर बोलवशील
मौलवी ची बायको - कोणत्या?
मौलवी - अग ... त्या शेजारनीला जी कुणी मेल्यावर त्या मुडदयाला चिपकुन - चिपकुन भोकाड पसरते
प्रत्येक भारतीय स्त्री ही आपल्या जीवनात राणी लक्ष्मीबाई असते.
कारण लग्नाच्या आधी ती राणी आसते.
लग्नानंतर लक्ष्मी बनते.
आणि मुलं झाल्यानंतर नुसती राब राब राबनारी बाई बनते
कॉलेज ला कधी जायचं नसतं
गेल्यावर मुलींशी कधी बोलायचं नसतं
बोललच तर प्रेमात पाडायच नसतं
पडलच तर घाबरून पलायाचा नसतं
आणि पलायच असेलच तर ...
तिलाही सोबत न्यायच असतं