१ )चांदीच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ.
२)एक होती चिऊ एक होती काऊ,
...... रावांच नाव घेते , डोक नका खाऊ.
३)चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे.
४)बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या,
........रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.
५)वाकडी तिकडी बाभूळ, तिच्यावर बसला होला,
सखा पाटील मेला , म्हणून तुका पाटील केला.
६)रेशमी सदर्याला प्लास्टीकचे बक्कल,
.......रावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.
७)तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
........रावांशी केले लग्न, आता आयूष्याची वाट.
No comments:
Post a Comment