Friday, December 21, 2012

का झालं बे?

Previous Joke Next Joke

.बंड्या (डॉक्टरले) : डॉक्टर, लई उसन भरली हाय कमरेत.
डॉक्टर: का झालं बे?
बंड्या: काई नाई डॉक्टर सायब. आज सकाडीच कारखान्यातून नाईट शिफ्ट करून रोजपेक्षा थोडं लवकरघरी आलो.
बायकोन दरवाजा उघडला. आनं पायतो त का? घरच्या बाल्कनीचा दरवाजा खुलाच.
तसाच धावत धावत बाल्कनीत गेलो त खाली यक माणूस शर्टची बटनं लावत धावताना दिसला.

मावा दिमाकच खराब झाला नं, तशीच किचन मंदली फ्रीज उचलली आनं मारलीनं त्या मानसाले फेकून.
च्या मायला लईच उसन भरली कमरेत.
डॉक्टर: या गोड्या घ्या वाटण बर लवकरच. नेक्स्ट....
(दुसरा पेशंट आत येतो)
डॉक्टर: तुमाले का झालं?
पेशंट: का सांगू तुमाले डॉक्टर. सकाडी सकाडी लईच आयटम झाला.
आज पासून एका जागी कामाले जाणार होतो. सकाडी लवकर उठाची सवय नोवती.
आनं आलाराम वाजूनबी जाग नाई आली. मनून गडबडीत कामालेजात होतो. त वरच्या एका माणसान फ्रीजच फेकून मारली नं.
सायब कामाचं रायलं जागेवरच. आनं हे दुकण्याची नसली 'डेंग डेंग' बी मागं लागली.
डॉक्टर: हे औषद घ्या. वाटन लवकर बरं. नेक्स्ट....
(दुसरा पेशंट आत येतो.)
डॉक्टर: का झालं?
पेशंट: काई नाई डॉक्टर. माई लवर हाय नं. काल रात्री तिले भेटाले गेलो होतो.
सकाडी सकाडी तिचा नवरा आला लवकर. मंग का करणार?
लपलो फ्रीजमधी. त त्या बैताड मानसान फ्रीजच फेकून देली वरच्या मजल्या वरून खाली.
डोक्स लईच दुकून रायलं सायेब.
डॉक्टर: लईच जांगळबुत्ता दिसून रायला. ... :)


.

Previous Joke Next Joke

No comments:

Post a Comment

POPULAR JOKES====>